भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने विक्रमाचा आणखी एक तुरा आपल्या शिरपेचात रोवला. विक्रमवीर सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १७ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यातील पाचव्या षटकात बेन हिलफेनहास याच्या गोलंदाजीवर शेवटच्या चेंडूवर सचिनने तीन धावा घेत १७ हजार धावा केल्या. सामन्यात सचिनने ८१ चेंडूत १०० धावांची खेळी करत ४५ शतक पूर्ण केले.
वयाच्या १९ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार्या सचिनने मजल दरमजल करत आज हा टप्पा गाठला आहे. सचिनने १८ डिसेंबर १९८९ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.हजारी धावांचे टप्पे - १,००० धावा - ३६ व्या सामन्यात १९९२ मध्ये झिंम्बाब्वेविरुद्ध२,००० धावा - ७३ व्या सामन्यात १९९४ मध्ये यूएईविरुद्ध३,००० धावा - ९६ व्या सामन्यात १९९५ मध्ये श्रीलंकाविरुद्ध४,००० धावा - ११५ व्या सामन्यात १९९६ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध५,००० धावा - १४१ व्या सामन्यात १९९७ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध६,००० धावा - १७६ व्या सामन्यात १९९८ मध्ये पाकिस्तानविरुद्ध७,००० धावा - १९६ व्या सामन्यात १९९८ मध्ये श्रीलंकाविरुद्ध८,००० धावा - २१७ व्या सामन्यात १९९९ मध्ये पाकिस्तानविरुद्ध९,००० धावा - २४२ व्या सामन्यात २००० मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध१०,००० धावा - २६६ व्या सामन्यात २००१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध११,००० धावा - २८४ व्या सामन्यात २००२ मध्ये इंग्लंडविरुद्ध१२,००० धावा - ३१० व्या सामन्यात २००३ मध्ये पाकिस्तानविरुद्ध१३,००० धावा - ३३० व्या सामन्यात २००४ मध्ये पाकिस्तानविरुद्ध१४,००० धावा - ३५९ व्या सामन्यात २००६ मध्ये पाकिस्तानविरुद्ध१५,००० धावा - ३७६ व्या सामन्यात २००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध१६,००० धावा - ४०७ व्या सामन्यात २००९ मध्ये श्रीलंकेविरुद्ध१७,००० धावा - ४३५ व्या सामन्यात २००९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध