ग्वाल्हेर येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील पहिले द्विशतक झळकाविणारा मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडूलकर हा पहिला फलंदाज आहे. त्याची सर कोणालाही करता येऊ शकणार नाही, असे म्हणून भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने गौरोद्गार काढले आहे.
गांगुली सध्या विजय हजारे स्पर्धेत बंगाल संघाकडून खेळत आहे. गांगुलीच्या मते, सचिन जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू आहे. सर डॉन ब्रॅडमन यांच्यासोबत तो खेळला नाही. मात्र, सचिन नावाच्या महान खेळाडूसोबत खेळल्याचा त्याने अभिमान व्यक्त केला.