क्रिकेटचा देवता म्हणून ओळखला जाणार्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकराचा शनिवारी (ता.24) रोजी 37 वा वाढदिवस आहे. वयाच्या 37 व्या वर्षीही सचिनच्या धावांची भूक कायम असून त्याची बॅट आजही फटकेबाजी करीत आहे.
24 एप्रिल 1973 साली जन्मलेल्या सचिनने क्रिकेट जगातील एकामागे एक शिखरे पदाक्रांत केली आहे. आता त्याचे विक्रम मोडणे अशक्य कोटीतील बाब झाली आहे. 15 नोव्हेंबर 1989 रोजी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सचिन गेल्या 20 वर्षांपासून सतत खेळत आहे.
सचिनने 166 कसोटीत 47 शतक आणि 54 अर्धशतकांसह 13447 धावा केल्या आहेत. 442 एकदिवसीय सामन्यात 46 शतक आणि 93 अर्धशतक करीत 17546 धावांचा शिखर सचिनने गाठला आहे. सध्या सुरु असलेल्या आयपीएलमध्ये त्याच्या सर्वाधिक 570 धावा झाल्या असून ऑरेंज कॅपचा स्पर्धेत तो सर्वाधिक आघाडीवर आहे.