'सचिन तेंडुलकर घरी असला म्हणजे सामन्य व्यक्ती असतो. इतर पतींप्रमाणे तो घरातील कामांना मदत करतो. तो एक चांगला स्वयंपाकी आहे. तसेच चांगला पिताही आहे,' असे सचिनच्या खासगी आयुष्यातील प्रसंग त्याची पत्नी अंजलीने उघडले आहे.
क्रिकेटमधील महानायक असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या खासगी जिवनाबद्दल फारशी माहिती कोणाला नाही. त्याने दिलेल्या विविध मुलाखतीतही त्यांना आपल्या पारिवारीक जीवनातील माहिती उघड केलेली नाही. परंतु 'सचिन: क्रिकेटचा माहानायक' या डायमंड बुक्सने प्रकाशित केलेल्या पुस्तकात अंजलीने अशी बरीच माहिती दिली आहे. सचिनबरोबर असलेल्य मधूर संबंधाबाबतही तिने या पुस्तकात लिहिले आहे.
अंजलीने पुस्तकात म्हटले आहे की, सचिनला डिझाईनचे कपडे आवडता. परंतु त्याचा कोणताही विशेष्ट असा ब्रॅन्ड नाही. मलाही तो स्कर्ट किंवा आधुनिक कपडे परिधान करुन देत नाही. सलवार, साडी, जिन्स या कपड्यांमध्ये त्याला मी आवडते. घरी असला म्हणजे तो सामन्य व्यक्ती असतो. कधी स्वयंपास मदत करतो. मुलांबरोबर दंगामस्ती करतो. मुलांबरोबर अगदी मुलांसारखा तो राहतो. तो त्यांचा सामन्य पिता असतो.