हुड्डा यांनी सचिनला दिल्या शुभेच्छा!
चंडीगढ , गुरूवार, 25 फेब्रुवारी 2010 (12:03 IST)
हरियाणाचे मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुड्डा यांनी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दुहेरी शतक झळकावून पहिला फलंदाज बनण्याचा बहुमान मिळविणार्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरला शुभेच्छा दिल्या आहेत. सचिनने दक्षिण आफ्रिकेविरुध्द ग्वाल्हेरमध्ये झालेल्या दुसर्या वन-डेत नाबाद 200 धावा करून नवा इतिहास रचून भारताचे नाव उज्ज्वल केले आहे, असे हुड्डा म्हणाले. भारताचा हा महान फलंदाज असे नवीन विक्रमकरून टीम इंडियाचा आत्मविश्वास वाढवत आहे. सचिनचा हा विक्रम म्हणजे आगामी वर्षी होणार्या विश्वचषकासाठी चांगले संकेत असल्याचे ही हुड्डा म्हणाले.