जय दे जय देव जय साईनाथा।। श्री सद्गुरुनाथा।। विश्वंभरा विश्वेशा । तारक तू जगता ।।धृ।। ब्रह्मांडाचा नायक देवा तू कळले। प्रत्यय निजभक्तांचे अद्भुत दावियेले।। ब्रह्मा विष्णू शंकर गणपती तू त्राता। भजतां तव पदकमला हरिसी भवचिंता।।1।। हरूनि दारिद्र्याते रंका रक्षियले। रोगग्रस्तां तुझिया उदिनें तारियले।। वांझेसी तोषविलें देऊनिया पुत्रा। जो जो वांछिल त्यांचा तू अससी दाता ।।2।। ज्ञानरवी तू दिधले ज्ञान अज्ञाना। सन्मार्गा लावुनिया उद्धरिले त्यांना।। ऐशी तू सकलांची ममताळू माता। रोमांचित तनु होई गुण महिमा गातां।।3।। यमपाशा तोडुनी तू भक्त सोडविले। आयुर्बल देऊनि त्या सकला तोषविले।। ऐसे सामर्थ्याचे प्रताप तव गातां। शिणली मति मग आलों शरण तुला नाथा।।4।। मद्वचनी विश्वासुनि जे सेवा करिती। त्यांची चिंता लागे रात्रंदिन मजसी।। ऐसे दृढ आश्वासन दिधलेसी जगता। करुणेचा सागर तू अससी गुरुनाथा।।5।। समतेची योगाची मूर्ती श्री साई। रिद्धिसिद्धी घेती लोळण तव पायीं।। अंतर साक्षी तुजला सर्वांची वार्ता। अगम्य तुजला कांहीं ऐसा तू ज्ञाता ।।6।। लाभे फळ करितां तव नवस समाधीला। दाखविसी अद्यापी निज साद लीला।।