किंचित गारवा आता हवेत आला,
दुधाळ चांदणं, चंद्र प्रकाश पसरला,
कित्ती गुणधर्म असती त्या प्रकाशात,
लक्ष्मी -कुबेरा ची आज महती गातात,
चांदण्यात सिद्ध, दुग्ध प्राशन करावे,
आरोग्यासाठी ऊत्तम ते, सकळां घ्यावे,
करावी साजरी कोजागिरी रात्रभर जागुन!
लक्ष्मी विचारी, "को जगरती" म्हणून!
अश्विनी थत्ते