सन 1659 साली शिवाजी महाराजांनी कल्याण दुर्गांवर विजय मिळवली. त्या काळाच्या परंपरेनुसार विजयी पक्षाचा हक्क जिंकलेल्या राज्यांच्या बायकांवर ही असायचा.
शिवाजी महाराजांच्या सुभेदार सोनदेवने पराभूत झालेल्या कल्याण दुर्गच्या मुस्लिम सुभेदाराची सून गौहर बानू यांना शिवाजी महाराजांच्या समोर सादर केले. प्रथम शिवाजींनी सुभेदार सोनदेव यांचा कृत्याची सुभेदाराच्या वतीने गौहर बानूंची माफी मागितली पण गौहर बानूंच्या सौंदर्याला बघून ते एवढेच म्हणाले की "आमच्या मातोश्री आपल्या एवढ्याच सुंदर असत्या तर आम्ही पण सुंदर झालो असतो". असे म्हणून त्यांना मुक्त करून आदरानं त्यांची पाठवणी केली गेली.
त्यांच्या या वागणुकीमुळे त्यांनी हे जगास दाखवून दिले की ते इतर बायकांना पण आपल्या मातेप्रमाणे मानत असून त्यांच्या मनात बायकांसाठीचे आदर दाखवून दिले. या घटनेनंतर हिंदूच नव्हे तर मुस्लिमांनाही शिवाजी महाराजांच्या चारित्र्यांवर विश्वास बसला.
तात्पर्य : छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्याचा हिंदू आणि मुस्लिम दोघांना आदर आणि विश्वास असे.