Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Shiv Rajyabhishek Din 2022 Wishes In Marathi शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

shivaji maharaj
सोमवार, 6 जून 2022 (12:33 IST)
इतिहासालाही धडकी भरेल
असं धाडसं या मातीत घडलं,
दगड-धोंड्यांच्या स्वराज्यात
सुवर्णसिंहासन सजलं
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्व हार्दिक शुभेच्छा...
 
हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं …
दरीत झेप घ्यायची असेल तर आकाशाएवढं धाडस हवं…
पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशा सारखी कला हवी …
अन साम्राज्य निर्माण करायचे असेल
तर “शिवबाचच” काळीज हवं...
शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा...
 
निश्चयाचा महामेरू।
बहुत जनासी आधारू।
अखंडस्थितीचा निर्धारू।
श्रीमंत योगी।।
शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा!
 
शिवराज्याभिषेक दिनी
छत्रपती शिवाजी महाराजांना
मानाचा मुजरा
 
शिवरायांचे आठवावे रूप
शिवरायांचा आठवावा प्रताप
शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा!
 
सोहळा हा स्वराज्याचा,
महाराष्ट्राचा अस्मितेचा
सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

यंदाची पंढरपूर वारी निर्बंधमुक्त!