Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पितृ पंधरवड्यात या ‍दिवशी सोनं खरेदी करणे शुभ, 8 पटीने वृद्धी होते

पितृ पंधरवड्यात या ‍दिवशी सोनं खरेदी करणे शुभ, 8 पटीने वृद्धी होते
, बुधवार, 9 सप्टेंबर 2020 (09:36 IST)
श्राद्ध पक्षात कोणतेही शुभ कार्य करणे वर्जित मानले गेले आहे जसे नवीन वस्तू खरेदी करणे, नवीन परिधान धारण करणे इतर... तरी या 16 कडू दिवसांमध्ये अष्टमीचा दिवस शुभ मानला गेला आहे. 
 
श्राद्ध पक्षात येणार्‍या अष्टमीला लक्ष्मीचा वरदान असल्याचे मानले गेले आहे. या दिवशी सोने खरेदी करण्याचे महत्त्व आहे. या दिवशी सोनं खरेदी केल्याने त्यात आठ पटीने वृद्धी होते असे मानले गेले आहे। सोबतच इतर खरेदीसाठी देखील हा दिवस शुभ असल्याचे म्हटलं जातं. 
 
या दिवशी हत्तीवर स्वार महालक्ष्मीची पूजा केली जाते. संध्याकाळी स्नान करून देवघरात एका चौरंगावर लाल कपडा पसरवून त्यावर केशर-चंदनाने अष्टदळ तयार करून त्यावर अक्षता ठेवून जल कलश ठेवतात. कळशाजवळ हळदीने कमळ तयार करून त्यावर लक्ष्मीची मूर्ती प्रतिष्ठित करतात. मातीच्या हत्तीला स्वर्णाभूषण घालून सजवतात. चांदी किंवा सोन्याचा हत्ती देखील ठेवता येतो. 
 
देवी लक्ष्मी समक्ष श्रीयंत्र ठेवून कमळाच्या फुलाने पूजन करतात. पूजेत घरातील सोने-चांदीचे दागिने ठेवतात. नंतर अष्ट लक्ष्मीची मंत्रांसह कुंकू, अक्षता आणि फुलं अर्पित करून पूजा करतात-
 
- ॐ आद्यलक्ष्म्यै नम:
- ॐ विद्यालक्ष्म्यै नम:
- ॐ सौभाग्यलक्ष्म्यै नम:
- ॐ अमृतलक्ष्म्यै नम:
- ॐ कामलक्ष्म्यै नम:
- ॐ सत्यलक्ष्म्यै नम:
- ॐ भोगलक्ष्म्यै नम:
- ॐ योगलक्ष्म्यै नम:
 
नंतर धूप-दीप पूजन करून नैवेद्य दाखवतात आणि महालक्ष्मीची आरती करतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मंगळवारची आरती