पितृपक्षात सर्व दिवस कडू असले तरी अष्टमीचा दिवस विशेष मानला जातो कारण या दिवशी गजलक्ष्मी व्रत ठेवण्यात येत असून या दिवशी देवी लक्ष्मी भक्तांना भरभरुन आशीर्वाद देते.
उपाय
पितृ पक्षाच्या अष्टमीला एखाद्या ब्राह्मण सुवासिनीला सोनं, कळश, अत्तर, कणिक, साखर आणि तूप भेट करावं. या व्यतिरिक्त एखाद्या कुमारिकेला नारळ, खडीसाखर, मकाने आणि चांदीचा हत्ती भेट करणे शुभदायी ठरतं.
असे केल्याने महालक्ष्मी प्रसन्न होते. आपण इच्छुक असल्यास हे सर्व आपल्या मुलीला देखील भेट म्हणून देऊ शकता.
गजलक्ष्मी व्रत अत्यंत फलदायी आहे. हा संयोग विशेष शुभदायी आहे.