पितृपक्ष भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरु होतो आणि 15 दिवस म्हणजे अश्विन महिन्यातील कृष्णपक्षाच्या अमावास्ये पर्यंत असतो. यंदा पितृपक्ष 17 सप्टेंबर पासून सुरु झाला असून 2 ऑक्टोबर पर्यंत आहे.
या 15 दिवस आपले पितर पितृलोकातून पृथ्वीवर येतात असे मानले जाते. आपल्या पितरांच्या आत्म्यांच्या शांतीसाठी आणि तृप्तीसाठी श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण विधी करतात. असं केल्याने पूर्वज आशीर्वाद देतात आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. पितरांचे ऋण देखील या विधीमुळे फेडले जातात. त्यांना मोक्ष मिळतो असे मानले जाते.
आपल्या पितरांचे पक्षातील तिथीनुसार श्राद्ध करावे असे शुभ मानले जाते. पितृदोषापासून मुक्ती मिळते. या साठी ब्राह्मणांना दान दिले जाते.पितृपक्षाची समाप्ती सर्वपितृ अमावस्या म्हणजे 2 ऑक्टोबर रोजी होणार. सर्व पितृ मोक्ष अमावस्याला होणार आहे.या काळात केलेलं तर्पण सरळ पितरांपर्यंत पोहचतं आणि पितर प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात असे म्हटले आहे.
विधीसाठी लागणारे साहित्य -
गंगाजल, दूध, कापड, दौहित्र, कुश, तीळ, मध, तुळस, कास्याचे पात्र, पत्रावळ
श्राद्धात तुळस देखील वापरली जाते, याने पितृ प्रसन्न राहतात अशी मान्यता आहे. श्राद्धात सोनं, चांदी, तांबा किंवा कांस्याचे पात्र किंवा पत्रावळ वापरली जाते.
श्राद्धात केळीच्या पानावर नैवेद्य वाढणे वर्जित मानले गेले आहे. श्राद्धात ब्राह्मणाला बसण्यासाठी लोखंडी आसान वापरणे वर्जित आहे. तसेच श्राद्ध किंवा तर्पण मध्ये लोखंडी आणि स्टील पात्र वापरु नये.
या प्रकारे करा पिंडदान
पितरांना तर्पण देण्यासाठी दूध, तीळ, कुश, फुलं, गंध इतर पाण्यात मिसळून अर्पित केल्याने पूर्वजांना तृप्त होतील. पिंडदान करुन ब्राह्मणांना भोजन करवावे. वस्त्रदान करावे. दक्षिणा द्यावी कारण दक्षिणा दिल्याविना श्राद्ध अपूर्ण मानलं जातं. दक्षिणा देण्याने श्राद्धाची पूर्ण फल प्राप्ती होते. काही शक्य नसेल तर किमान पाण्याने तर्पण करावे जेणे करून पितरांना पाणी प्राप्त होतं आणि त्यांची तहान भागते.
पितृपक्षाच्या शेवटल्या दिवशी सर्वपितृ अमावस्या असते ज्यादिवशी कळत-नकळत चुकत असलेलं तसेच सर्व पितराच्या नावाने श्राद्ध केलं जातं. प्रत्येक अमावस्येला तर्पण करावे. रात्रीच्या काळात श्राद्ध करणे योग्य नाही.दुपारी 12 वाजता पितरांचे श्राद्ध केले जाते.
सनातन धर्माप्रमाणे पुत्र वडिलाचं श्राद्ध करतो ज्याने त्यांच्या आत्म्याला मुक्ती मिळते आणि मोक्षाची प्राप्ती होते. पुत्र नसल्यास पत्नी श्राद्ध करु शकते. एकाहून अधिक पुत्र असल्यास ज्येष्ठ पुत्राने श्राद्धकर्म करावे.
पितरांना तर्पण देण्यासाठी दूध, तीळ, कुश, फुलं, गंध इतर पाण्यात मिसळून अर्पित केल्याने पूर्वजांना तृप्त होतील. पिंडदान करुन ब्राह्मणांना भोजन करवावे. वस्त्रदान करावे. दक्षिणा द्यावी कारण दक्षिणा दिल्याविना श्राद्ध अपूर्ण मानलं जातं. दक्षिणा देण्याने श्राद्धाची पूर्ण फल प्राप्ती होते. काही शक्य नसेल तर किमान पाण्याने तरपण करावे ज्यानेकरुन पितरांना पाणी प्राप्त होतं आणि तहान भागते.
पितृपक्षाच्या शेवटल्या दिवशी सर्वपितृ अमावस्या असते ज्यादिवशी कळत-नकळत चुकत असलेलं तसेच सर्व पितराच्या नावाने श्राद्ध केलं जातं. प्रत्येक अमावस्येला तरपण करावे. रात्रीच्या काळात श्राद्ध करणे योग्य नाही.
सनातन धर्माप्रमाणे पुत्र वडिलाचं श्राद्ध करतो ज्याने त्यांच्या आत्म्याला मुक्ती मिळते आणि मोक्षाची प्राप्ती होते. पुत्र नसल्यास पत्नी श्राद्ध करु शकते. एकाहून अधिक पुत्र असल्यास ज्येष्ठ पुत्राने श्राद्धकर्म करावे.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.