rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Pitru Paksha 2021 : कधी सुरू होतोय पितृपक्ष, श्राद्ध पक्षाच्या तारखा जाणून घ्या

sharad 2021 date in india calendar
, सोमवार, 13 सप्टेंबर 2021 (17:59 IST)
हिंदू धर्मात पितृपक्षाचा काळ भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून ते सर्वपित्री अमावस्येपर्यंत असतो. तर आपण जाणून घेऊ की 2021 मध्ये पितृ पक्ष कधी सुरू होणार आणि तिथीप्रमाणे तारखा काय आाहेत-
 
यंदा 2021 मध्ये पितृपक्ष 20 सप्टेंबरपासून सुरु होत आहे. पितृपक्षाचं समापन 6 ऑक्टोबर बुधवारी होईल. या संपूर्ण 15 दिवसांमध्ये, पूर्वजांना अन्न आणि पाणी देऊन त्यांना संतुष्ट करण्याची प्रथा आहे. वडिलांच्या मृत्युतिथीला या पितृपक्षकाळात ज्येष्ठ पुत्राने श्राद्ध करावे असा संकेत आहे. त्यानिमित्त पिंडदान करतात. प्रत्येक गृहस्थाश्रमीला तीन प्रकारचे कर्ज (ऋण) फेडायचे असते, असा समज आहे. मातृऋण, पितृऋण व समाजऋण. ही सर्व ऋणे पुत्राने/पौत्राने फेडणे हे त्याचे कर्तव्य आहे असा शास्त्रसंकेत आहे. या पितृऋणातून मुक्त होण्यासाठी श्राद्ध विधी करतात. 
 
श्राद्धविधी सुरू असतांना मृत व्यक्तीचा आत्मा तेथे वासनामय कोषात उपस्थित असतो, असा समज आहे. पितरांचे श्राद्ध करतांना पिता, पितामह, प्रपितामह, मातामह यांचेही स्मरण करतात. त्या आधीच्या पिढ्या ह्या मुक्त झालेल्या असतात असे मानतात. शुद्ध मनाने श्राद्ध करणाऱ्यास मृत्यूनंतर स्वर्ग मिळतो अशी भावना आहे. अमावस्या व पौर्णिमेस मृत झालेल्यांचे श्राद्ध अमावस्येस करतात. भाद्रपद कृष्ण चतुर्दशीस शस्त्राघाताने मृत्यू पावलेल्यांचे श्राद्ध करतात. पितृपक्षात अन्नदान व गोग्रास यांचेही महत्त्व मानतात. अधिक मासात मृत्यू पावलेल्याचे श्राद्धही महालयात (पितृपक्षात) त्याच तिथीवर करतात.
 
पितृ पक्षातील श्राद्धाच्या तारखा
 
पौर्णिमा श्राद्ध - 20 सप्टेंबर, सोमवार
प्रतिपदा श्राद्ध - 21 सप्टेंबर, मंगळवार
द्वितीया श्राद्ध - 22 सप्टेंबर, बुधवार
तृतीया श्राद्ध - 23 सप्टेंबर, गुरुवार
चतुर्थी श्राद्ध - 24 सप्टेंबर, शुक्रवार
पंचमी श्राद्ध - 25 सप्टेंबर, शनिवार
षष्टी श्राद्ध - 27 सप्टेंबर, सोमवार
सप्तमी श्राद्ध - 28 सप्टेंबर, मंगळवार
अष्टमी श्राद्ध - 28 सप्टेंबर, बुधवार
नवमी श्राद्ध - 30 सप्टेंबर, गुरुवार
दशमी श्राद्ध - 1 ऑक्टोबर, शुक्रवार
एकादशी श्राद्ध - 2 ऑक्टोबर, शनिवार
द्वादशी श्राद्ध - 3 ऑक्टोबर, रविवार
त्रयोदशी श्राद्ध - 4 ऑक्टोबर, सोमवार
चतुर्दशी श्राद्ध - 5 ऑक्टोबर, मंगळवार
अमावस्या श्राद्ध - 6 ऑक्टोबर, बुधवार
 
या वर्षी 26 सप्टेंबर ही श्राद्धची तारीख नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रांजणगावाचा महागणपती