Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Pitru Paksha 2020: श्राद्ध पक्षात चुकून नका करू हे 10 काम

webdunia
सोमवार, 31 ऑगस्ट 2020 (12:25 IST)
1- श्राद्ध पक्षात कोणी भोजन किंवा पाण्यासाठी याचना केल्यास त्याला रिकाम्या हाती जाऊ देऊ नका. या दरम्यान पितर कोणत्याही रूपात येऊन अन्न आणि पाण्यासाठी इच्छुक असतात असे म्हटलं जातं.
2- गाय, कुत्रा, मांजर, कावळा यांना श्राद्ध पक्षात हानी पोहचवणे योग्य नाही. या दरम्यान यांना भोजन देणे योग्य मानले गेले आहे.
3- या काळात मासांहारी भोजनाचे सेवन करणे टाळावे. दारू आणि मादक पदार्थांचे सेवन टाळावे.
4- कुटुंबात आपसात कलह-वाद टाळावे. ब्रह्मचर्याचे पालन करावे. 
5- नखं, केस किंवा दाढी-मिशा काढणे टाळावे. कारण श्राद्ध पितरांचे स्मरण करण्याचा काळ आहे. यात एकाप्रकारे शोक व्यक्त केला जातो.

6- पितृपक्षात भोजन तयार केल्यावर त्यातून एक भाग पितरांसाठी काढून गाय किंवा कुत्र्याला द्यावा.
7- भौतिक सुखाचे साधन जसे नवीन वस्त्र, दागिने, वाहन खरेदी करणे शुभ नसल्याचे सांगितले गेले आहे कारण हा काळ शोकाचा मानला गेला आहे.
8 - पितृपक्षात कोणत्याही परिस्थितीत खोटे बोलणे तसेच कडू बोलणे टाळावे. आपल्याला वाणीमुळे कोणालाही दु:ख होता कामा नये याची काळजी घ्यावी. 

9 - पितृपक्ष दरम्यान घरातील कुठल्याही कोपर्‍यात अंधार नसावा याची काळजी घ्यावी.
10- पितृपक्षात कुटुंबाच्या सन्मानाविरुद्ध वागू नका.

Share this Story:

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

केरळातील सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा उत्सव : ओणम