Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Nag Panchami 2022 नागपंचमीला राशीनुसार करा या मंत्रांचा जप, कुंडलीतील ग्रह शांत होतील, सर्व दोष दूर होतील

Nagpanchami
, रविवार, 31 जुलै 2022 (18:28 IST)
Nag Panchami 2022 यावर्षी नागपंचमी 2 ऑगस्ट 2022 रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी श्रावण महिन्यातील मंगळा गौरी व्रत देखील आहे. धार्मिक मान्यतांनुसार नागपंचमीच्या दिवशी नाग देवतेची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे नष्ट होतात आणि तुमच्यामध्ये आध्यात्मिक शक्ती विकसित होते.
 
Nag Panchami 2022 Mantra हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक, नागपंचमीचा सण मंगळवार, 2 ऑगस्ट 2022 रोजी येत आहे. या दिवशी नागदेवतेची पूजा करण्याचा नियम आहे. हिंदू धर्मात सापाला भगवान शंकराच्या गळ्यातील अलंकार मानले जाते. त्यामुळे या दिवशी नागांची देवता महादेवाची पूजा करणे शुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार नागपंचमीच्या सणावर शिवलिंगावर अभिषेक, शिव सहस्रनाम स्रोताचे पठण आणि महामृत्युंजय मंत्राचा जप असाही नियम आहे.
 
या दिवशी सर्पदेवतेची प्रामाणिक मनाने व पद्धतशीर पूजा केल्यास त्याच्यात आध्यात्मिक शक्ती येते आणि आर्थिक संकटे दूर होतात, असे मानले जाते. तसेच ज्योतिष शास्त्राच्या तज्ज्ञांच्या मते कुंडलीतील कालसर्प दोष आणि राहू-केतू ग्रह दोष दूर होण्यासोबतच कुंडलीतील सर्व ग्रह शांत होतात. चला तर मग जाणून घेऊया राशीनुसार नागपंचमीची पूजा केल्यानंतर कोणते मंत्र खूप फलदायी मानले जातात.
 
नागपंचमीला राशीनुसार या मंत्रांचा जप करा
 
मेष - ॐ वासुकेय नमः
 
वृष- ॐ शुलिने नमः
 
मिथुन- ॐ सर्पाय नमः
 
कर्क- ॐ अनन्ताय नमः
 
सिंह- ॐ कर्कोटकाय नमः
 
कन्या- ॐ कम्बलाय नमः
 
तूळ- ॐ शंखपालय नमः
 
वृश्चिक- ॐ तक्षकाय नमः
 
धनू- ॐ पृथ्वीधराय नमः
 
मकर- ॐ नागाय नमः
 
कुंभ- ॐ कुलीशाय नमः
 
मीन- ॐ अश्वतराय नमः

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पहिला श्रावण सोमवार 2022 : श्रावण सोमवार पुजा आणि व्रत कसे करावे