Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Hariyali Amavasya आर्थिक संकटावर मात करेल हा एक उपाय

webdunia
वर्षभर साजरे करण्यात येणार्‍या सणांमध्ये हरियाली अमावस्या एक खास सण आहे. या अमावास्येला देवी पार्वतीची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात असे मानले गेले आहे. शास्त्रांप्रमाणे या वर्षी हरियाली अमावास्येचा महायोग 125 वर्षांनंतर बनत आहे. ज्योतिष्यांप्रमाणे या दिवशी काही उपाय केल्याने व्यक्तीला धन प्राप्ती, संतान सुख आणि सौभाग्य प्राप्तीचे वरदान मिळेल. आज आम्ही आपल्याला या अमावस्या तिथी, शुभ मुर्हूत, पूजा विधी आणि या दिवशी करण्यासाठी 1 विशेष उपाय सांगणार आहोत.
 
वर्ष 2019 मध्ये हरियाली अमावस्या सण 1 ऑगस्ट गुरुवारी असून अमावस्या तिथी 31 जुलै सकाळी 11.57 मिनिटापासून सुरू होईल. तसेच 1 ऑगस्ट रोजी सकाळी 8.41 मिनिटावर अमावस्या तिथी समाप्त होईल.
 
या दिवशी शिव पार्वती पूजनाचे महत्त्व आहे. 
या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करावे.
या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्याचे देखील महत्त्व आहे परंतू ते शक्य नसेल तर अंघोळीच्या पाण्यात पवित्र नदीचे पाणी मिसळून स्नान करता येईल.
महादेवाच्या मंदिरा जाऊन शिवलिंगावर जलाभिषेक करावे.
या दिवशी दुपारी 12 वाजेपूर्वी पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा घालावी.
या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यावर यथाशक्ती दान करावे.
 
महाउपाय
या दिवशी शुभ संयोग बनत असल्याने शास्त्रांप्रमाणे देवी पार्वतीचे पूजन करून काही उपाय केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होऊन महिलांना सौभाग्याची प्राप्ती होते.
या दिवशी सकाळ-संध्याकाळ तुळशीच्या झाडाला दीपदान करावे याने जीवनातील धन संबंधी समस्या दूर होतील.
देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि आर्थिक संकाटांवर मात करण्यासाठी या दिवशी पंच महायोगात घराच्या ईशान कोपर्‍यात तुपाचा दिवा लावावा.
अमावस्येला संध्याकाळी महादेवाची पूजा करून खीरीचं नैवेद्य दाखवावं.
झाडांमध्ये देवी-देवतांचा वास असल्याचे मानले गेले आहे म्हणून या दिवशी एक झाड रोपावे हे देखील शुभ मानले गेले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दीप अमावस्या व्रत कथा