मालकच आमुचा त्राता अन भ्रतार,
या जन्मी चे आम्ही आहे साथीदार,
शेत नांगरतो आम्ही दोघे जण मिळून,
जिवा शिवा ची आमची जोडी, राखी इमान,
प्रेमाने तो ही घालतो हिरवा चारा आम्हास,
कधी कधी ढेपी चा ही भरवतो घास,
आला सण "बैल पोळा"झाला शेतकरी खुश,
आम्हाला ही कामातून गड्या मिळाला "हुश्श".
उद्या नको ते मानेवर ओझे जीवघेणे,
चिखल तुडवत तुडवत शेतामध्ये फिरणे,
घेईन विश्रांती घाडीभर, करून घेईन कौतुक,
घालीन झुल अंगावर, व्रण करून झाकझुक.
मग तर आहेच वर्ष भर मरमर कामाची,
सण आला आहे माझा,करा तुम्ही ही तयारी त्याची!!
...अश्विनी थत्ते.