Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नागपंचमी साजरा करण्याची पद्धत

नागपंचमी साजरा करण्याची पद्धत
श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे. या दिवशी घरोघरी नाग देवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे. वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यादिवशी स्त्रिया नवीन अलंकार, वस्त्रे नेसून नागदेवताची पूजा करतात. स्त्रिया पाटावर हळद-चंदनाने नाग-नागीण आणि त्यांच्या पिल्लांची चित्रे काढून त्याला दुध, लाह्या, आघाडा, दुर्वा वाहून पूजा करतात. श्रावण महिन्यात म्हणजेच पावसाळ्यात आघाडा सर्वत्र उगवतो. या सणात या वनस्पतीला महत्त्वाचे स्थान असते. नागदेवताची पूजा करून त्याला दुध, साखर, उकडीची पुरणाची दिंड करून नैवेद्य दाखवला जातो. या सणाला विशेषत: गव्हाची खीर आणि चण्याची डाळ, गूळ यांपासून बनवलेल्या उकडीची पुरणाची दिंड तयार केली जाते. 
 
'भावाला चिरंतन आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती होवो आणि तो प्रत्येक दु:ख आणि संकट यातून तारला जावो', हेही उपवास करणयामागे एक कारण आहे. या विषयीची कथा खालीलप्रमाणे...
 
नागपंचमीसाठी वेदकालापासून अनेक प्रथा आहेत. त्यापेकी एक कथा..सत्येश्वरी नावाची एक कनिष्ट देवी होती. सत्येश्वर हा तिचा भाऊ होता. सत्येश्वरीचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. त्यामुळे भावाच्या शोकात सत्येश्वरीने अन्न ग्रहण केले नाही. सत्येश्वरीला  तिचा भाऊ नागरूपात दिसला. तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानले. त्या वेळी नागदेवतेने वचन दिले की, जी बहीण माझा भाऊ म्हणून पूजा करील, तिचे लक्षण मी करीन. त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते..
 
तसेच दुसरी कथा कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले.. तेव्हापासून नागपंचमीची प्रथा सुरू झाली असेही मानले जाते. तसेच या दिवशी शेतकरी शेत नांगरत नाही. तसेच नववधू माहेरी येतात. झिम्मा, फुगड्या, झाडाला झोके बांधून खेळणे या गोष्टी करून स्त्रिया हा सन आनंदाने साजरा करतात. नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये वगैरे संकेत पाळले जातात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कहाणी नागपंचमीची