Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Pithori Amavasya 2022 कधी आहे पिठोरी अमावस्या 2022, पूजा पद्धत जाणून घ्या

pithori amavasya vrat
, बुधवार, 24 ऑगस्ट 2022 (11:46 IST)
श्रावण महिन्यात येणाऱ्या अमावस्याला पिठोरी अमावस्या म्हणतात. यावर्षी पिठोरी अमावस्या हि  27 ऑगस्टला शनिवारी येत आहे. याला कुषोत्पतिनी अमावस्या असेही म्हणतात. तसेच या दिवशी बैल पोळा सण देखील साजरा केला जातो.
 
पिठोरी व्रत करून आई पक्वान्न तयार करते. आणि ते डोक्यावर घेऊन 'अतीत कोण?' ('अतिथी कोण?') असे विचारते. तेव्हा मुलं 'मी आहे' असे आपले नाव सांगून पक्वान्न मागील बाजूने स्वतःकडे घेऊन घेतात. पिठोरी अमावास्येला वंशवृद्धीसाठी ही पूजा करण्यात येते. म्हणूनच याला मातृ दिन असे ही म्हणतात.
ही मुलांना दीर्घायुष्य मिळावे यासाठी साजरी करण्यात येत असून या दिवशी सायंकाळी अंघोळ करून आठ कलश स्थापित केले जाता. त्यावर पूर्णपात्रे ठेवून ब्राह्मी, माहेश्वरी व इतर शक्तींची पूजा केली जाते. तांदुळाच्याराशीवर चौसष्ट योगिनींना आवाहन देऊन पिठाच्या मूर्ती तयार केल्या जातात. तसेच पिठाने तयार केलेल्या पदार्थांचाच नैवेद्य दाखवण्यात येतं.
 
मुलांना दीर्घायुष्य मिळावे यासाठी पिठोरी अमावस्येचे व्रत करण्याची प्रथा आहे. पिठोरी अमावस्या पूजा पद्धत जाणून घ्या-
 
या दिवशी सकाळी लवकर उठून पवित्र नदीत स्नान करण्याची परंपरा आहे. असे शक्य नसल्यास पवित्र नदीचं पाणी आपल्या अंघोळीच्या पाण्यात मिसळून स्नान करावे. नंतर सूर्याला अर्घ्य द्यावे. दररोज प्रमाणे देवाची पूजा करावी.
अमावस्या तिथी पितरांची तिथी देखील मानली जाते म्हणून या दिवशी पिंड दान व तरपण करण्याचे देखील महत्त्व आहे.
या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना चपला, छत्री, शॉल व इतर वस्तू दान करावे.
शक्य असल्यास पुरी भाजी, शिरा तयार करून गरिबांना आणि विशेष करून लहान मुलांना खाऊ घालावा.
या दिवशी 64 देवींची पूजा आराधना केली जाते. या दिवशी आपल्या कुटुंबाची आणि मुलांच्या समृद्धीची प्रार्थना केली जाते. त्यांना दीर्घायू प्राप्त हो अशी प्रार्थना करावी.
या दिवशी क‍णकेने देवी प्रतिमा तयार करून पूजा करावी. आपल्या आवडीप्रमाणे त्यांना रंग देणे, सजवणे, वस्त्र परिधान करवणे हे देखील करता येऊ शकतं.
काही क्षेत्रांमध्ये देवी दुर्गेला योगिनी रूपात पुजतात. म्हणून प्रत्येक देवी अर्थात 64 योगिनींची पूजा केली जाते. या सर्व मुरत्या एका चौरंगावर किंवा पाटावर मांडाव्या.
त्यांना दागिने घालायचे असल्यास बेसनच्या पिठाचे दागिने तयार करावे. सवाष्णीचे सर्व दागिने तयार करून देवीला सजवावे.
अलीकडे त्यांची छापील चित्रे मिळतात.
पूर्ण विधिपूर्वक पूजा झाल्यावर आरती करावी. देवीला नैवेद्य दाखवावा.
व्रतात नैवेद्यासाठी पिठाचेच सर्व पदार्थ करावे. बेदाणे घातलेली भाताची खीर हा ‘पिठोरी’चा खास नैवेद्य.
खिरीच्या वाटीवर पुरी झाकून आईने ते डोक्यावर घेऊन ‘अतिथी कोण? असा प्रश्न विचारावा. मुलांनी ‘मी आहे’ असे म्हणून ते पक्वान्न मागच्या बाजूने काढून घ्यावे.
या दिवशी सप्तमातृका पूजा देखील केली जाते. शिव आणि शक्ती यांच्याद्वारे उत्पन्न 7 दिव्य माता ज्यांचे नावे ब्राह्मणी, वैष्णवी, महेश्वरी, कुमारी, वाराही, इंद्राणी, चामुंडी असे आहेत त्यांची पूजा केली जाते. नंतर शिवाद्वारे शक्ती योगेश्वरी उत्पन्न झाली. या देवीला आठवे स्थान प्राप्त झाले. म्हणून पिठोरी अमावास्येला 64 योगिनी आणि सप्तमातृकेची पूजा केली जाते.
पिठोरी अमावस्या व्रत केल्याने मुलं स्वस्थ, बुद्धिमान आणि शौर्यवान बनतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Bail Pola 2022 कधी आहे बैल पोळा अमावस्या 2022, महत्व आणि पूजन विधि