Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बिल्ववृक्ष आणि महालक्ष्मीची दुर्मिळ कहाणी सांगितली भोलेनाथाने देवी पार्वतीस ...

shiv mahadev
, सोमवार, 10 एप्रिल 2023 (06:44 IST)
महालक्ष्मीने का घेतले बेलवृक्षाचे रूप, शिवाने बिल्ववृक्षाला शिवस्वरूप का मानले आहेत?
एकदा नारदाने भोलेनाथांची स्तुती करत विचारले -  हे देवा आपणास प्रसन्न करण्यासाठी सर्वात उत्तम आणि सोपे साधन काय आहे, हे त्रिलोकीनाथ आपण तर निर्विकार आणि निष्काम आहात, आपण तर सहजच प्रसन्न होता. पण तरीही मला जाणून घ्यावयाचे आहेत की आपणास काय आवडतं ?
शंकर म्हणाले - नारदजी तसं तर मला भक्तांच्या भावना आवडतात. पण आपण विचारलेच आहे तर मी आपणास सांगतो.
मला पाण्यासह बेलाचे पान फार आवडतात. जे मला अखंड बिल्वपत्र किंवा बेलाचे पान भक्तिभावाने अर्पण करतो त्यांना मी माझ्या लोकात जागा देण्याचा मान देतो.
नारद शंकराला आणि देवी पार्वतीस नमस्कार करून आपल्या लोकात परत गेले. त्यांचा तिथून गेल्यावर पार्वतीने महादेवाला विचारले - देवा माझीदेखील हे जाणून घ्यावयाची इच्छा प्रबळ होत आहे की आपल्याला बेलाचे पानच का बरं एवढे आवडते ? कृपया आपण माझी ही उत्सुकता शांत करावी.
शिव म्हणाले - हे शिवे !बेलाचे पान माझ्या जटांसारखे आहेत. त्याचे त्रिपत्र म्हणजे याची तीन पाने ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद आहेत. यांचा डहाळ्या साऱ्या शास्त्रांचे स्वरूप आहेत. बिल्ववृक्षाला आपण या साऱ्या पृथ्वीचे कल्पवृक्ष म्हणून समजावं जे की ब्रह्म-विष्णू-शिवाचे स्वरूप आहेत.
पार्वते! खुद्द महालक्ष्मीने शैल या डोंगरावर बेलाच्या झाडाच्या रूपात जन्म घेतले होते, या कारणास्तव देखील मला हे बेलाचे झाड मला अत्यंत आवडते. खुद्द महालक्ष्मीने बेलाचे रूप घेतले, हे ऐकून पार्वती कुतूहलात पडल्या.
पार्वती आपल्या कुतूहलातून उद्भवलेल्या जिज्ञासाला रोखू शकली नाही. त्याने विचारले - देवी लक्ष्मीने अखेर का बरं बेलाच्या झाडाचे रूप घेतले ? आपण ही कथा सविस्तरपणे सांगावी.
भोलेनाथाने देवी पार्वतीस गोष्ट सांगावयास सुरुवात केली. हे देवी,  सत्ययुगात ज्योतिस्वरूपात माझे अंश रामेश्वर लिंग असे होते. ब्रह्म आणि इतर देवांनी त्याची विधिवत पूजा केली होती.
याचा परिणाम असा झाला की माझ्या कृपेने वाणी देवी म्हणजेच वाग्देवी किंवा देवी सरस्वती ह्या सर्वांच्या आवडत्या झाल्या. आणि त्या भगवान विष्णूंना देखील प्रिय झाल्या.
माझ्या प्रभावामुळे भगवान केशव म्हणजेच विष्णू यांचा मनात वाग्देवी साठी प्रेम उद्भवले ते या महालक्ष्मीस आवडले नाही.
लक्ष्मीच्या मनात श्री विष्णूसाठी दुरावा निर्माण झाला. त्या काळजीने आणि रागावून श्रीशैल डोंगरावर निघून गेल्या. तिथे त्यांनी तपश्चर्या करण्याचे ठरविले आणि त्यासाठी एक योग्य अशी जागा बघू लागल्या.
महालक्ष्मीने योग्य अशी जागा निवडून माझ्या लिंग विग्रहाची कठोर अशी तपश्चर्या सुरू केली. दिवसां न दिवस त्यांनी तपश्चर्या कठीण होत चालली होती.
हे, परमेश्वरी काहीच वेळा नंतर महालक्ष्मीने माझ्या लिंग विग्रहातून थोड्या वरील दिशेने एका झाडाचे रूप घेतले. आपल्या पाना-फुलांनी सतत माझी पूजा करत होत्या.
अश्या प्रकारे महालक्ष्मीने तब्बल एक कोटी वर्षापर्यंत घोर उपासना केली. शेवटी त्यांना माझी कृपादृष्टी प्राप्त झाली. आणि मी तिथे हजर झालो आणि देवीच्या या घोर तपश्चर्या करण्यामागील आकांक्षा विचारून वर देण्यास तयार झालो.
महालक्ष्मी ने मागितले की श्रीहरींच्या मनातून आपल्या प्रभावामुळे वाग्देवींसाठी जे प्रेम आहे ते संपुष्टात यावं.
शिव म्हणाले - मी महालक्ष्मीस समजावले की श्रीहरींच्या मनात आपल्या व्यतिरिक्त अजून कोणीही नाही. वाग्देवींसाठी त्यांचा मनात प्रेम नव्हे तर श्रद्धा आहेत.
हे ऐकल्यावर लक्ष्मी प्रसन्न झाल्या आणि पुन्हा श्री विष्णूंच्या मनात स्थित होऊन त्यांचा बरोबर राहू लागल्या.
हे देवी पार्वती ! महालक्ष्मीच्या मनाची अस्वस्थता अश्या प्रकारे दूर झाली. या कारणास्तव हरिप्रियाने त्या झाडाच्या रूपात भक्तिभावाने माझी पूजा करावयास सुरुवात केली.
हे पार्वती म्हणूनच बेलाचे झाड, त्यांची पाने -फुले, फळ हे सर्व मला अतिप्रिय आहे. मी एखाद्या निर्जन स्थळी बिल्ववृक्षाचे आश्रय घेऊन राहतो.
बेलाच्या झाडाला नेहमी सर्वतीर्थमय आणि सर्वदेवमय समजावं, यात अजिबात शंका नाही. बेलाचे पान, बेलाचे फुल, बेलाचे झाड किंवा बिल्वाकाठच्या चंदनाने जो भक्त माझी पूजा करतो तो मला प्रिय आहे.
बेलाच्या झाडाला शिवासमच समजावे. ते माझं शरीर आहे, जे बेलाच्या पानावर चंदनाने माझे  नाव लिहून मला ते अर्पण करतं मी त्यांना सर्व पापांपासून मुक्त करतो आणि त्यांना आपल्या लोकात शरण देतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जर तुम्हाला वाहन सुख हवा असेल तर सोमवारी हा सोपा उपाय करा