Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिव पुराणाचे उपाय : श्रावण महिन्याची शिव-भक्ती, देणार आजारापासून मुक्ती...

शिव पुराणाचे उपाय : श्रावण महिन्याची शिव-भक्ती, देणार आजारापासून मुक्ती...
, शनिवार, 18 जुलै 2020 (19:42 IST)
कोणत्याही माणसाच्या आयुष्यात आजार, कष्ट आणि आपत्तीसाठी काही खास ग्रह-नक्षत्रांची शुभ-अशुभ स्थिती जवाबदार असते. ग्रहांच्या शांततेसाठी काही उपाय केले तर मूळ लोकं कोणत्याही प्रकाराचे गंभीर आजाराला कमी करू शकतात.
 
शिव पुराणात श्रावणाच्या शुभ काळासाठी काही निश्चित उपाय सांगितले आहे. प्रत्येक माणसाला आपल्या जन्म कुंडलीत ग्रहांच्या शुभ-अशुभ स्थितीनुसार शिवलिंगाची पूजा करावी. ग्रहाशी निगडित त्रास आणि आजारांसाठी खालील उपायांचे अनुसरणं करावे.
 
जाणून घ्या ग्रहानुसार कोणत्या आजारासाठी काय उपाय केले जाऊ शकतात.
सूर्याशी निगडित डोकदुखी, डोळ्यांचा आजार, हाडांचा आजार इत्यादी असल्यास श्रावण महिन्यात शिवलिंगाची पूजा आकड्याच्या झाडाचे फुल पाने आणि बेलाची पानाने केल्याने या आजारात आराम मिळतो.
 
चांद्रमाशी निगडित आजार किंवा त्रास असल्यास जसे खोकला, सर्दी, पडसं, मानसिक समस्या, रक्तदाबाची समस्या इत्यादी होत असल्यास शिवलिंगाचे रुद्रपाठ करून काळेतील मिश्रित दुधाने रुद्राभिषेक केल्याने आराम मिळतो.
 
मंगळाशी निगडित आजार जसे की रक्तदोष असेल तर गिलोय, औषधी वनस्पती रस इत्यादी ने अभिषेक केल्याने आराम मिळतो.
 
बुधाशी निगडित आजार जसे की त्वचेचे आजार, मूत्रपिंडाचे आजार इत्यादी आजार असल्यास विदारा किंवा औषधी वनस्पतीच्या रसाने अभिषेक केल्याने आराम मिळतो.
 
बृहस्पतीशी निगडित आजार जसे की चरबी, आतड्यासंबंधी त्रास, यकृताचे आजार असल्यास शिवलिंगावर हळदमिसळून दूध अर्पण केल्याने आराम मिळतो.
 
शुक्राशी निगडित आजार असल्यास, वीर्याची कमतरता, शारीरिक किंवा सामर्थ्याचा अभाव असल्यावर पंचामृत, मध आणि तुपाने शिवलिंगाने अभिषेक केल्याने आराम मिळतो.
 
शनीशी निगडित आजार जसे की स्नायूंचे दुखणे, सांधे दुखी, वात रोग इत्यादी असल्यास उसाचा रस आणि ताकाने शिवलिंगाचे अभिषेक केल्याने आराम मिळतो.
 
राहू-केतूशी निगडित आजार जसे की गरगरणे, मानसिक त्रास, अर्धांगवायू इत्यादी साठी उपयुक्त सर्व वस्तूंच्या व्यतिरिक्त मृत संजीवनीचे सवालाख वेळा जप करवून भांग आणि धोत्र्याने शिवलिंगाचा अभिषेक केल्याने शांतता मिळते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नाग पंचमी : भारतात नाग पूजेशी निगडित जाणून घ्या 11 मनोरंजक माहिती