श्रावण हा शिवपूजनासाठी अतिशय महत्त्वाचा आणि पवित्र महिना मानला जातो. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा/सणांचा राजा म्हटले जाते. श्रावण महिन्यातील प्रत्येक वारी कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा वा व्रत करण्याची परंपरा आहे. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणाऱ्या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. यावर्षी किती श्रावण सोमवार आहेत जाणून घेऊया...
यावर्षी पवित्र श्रावण महिना 9 ऑगस्ट 2021 पासून सुरू होईल आणि 6 सप्टेंबर 2021 रोजी संपेल. श्रावण महिना भगवान शिव यांना खूप प्रिय असल्यामुळे या काळात महादेवाची पूजा करण्याचं विशेष महत्त्व आहे. या काळात महादेवाची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे. विशेषत: श्रावण महिन्यातील सोमवार व्रत- उपासान केल्याने तत्काळ फळ प्राप्ती होते असे म्हणतात.
1. पहिला श्रावण सोमवार – 09 ऑगस्ट 2021
2. दुसरा श्रावण सोमवार – 16 ऑगस्ट 2021
3. तिसरा श्रावण सोमवार – 23 ऑगस्ट 2021
4. चौथा श्रावण सोमवार – 30 ऑगस्ट 2021
5. पाचवा श्रावण सोमवार – 06 सप्टेंबर 2021
यावर्षी पवित्र श्रावण महिना 09 ऑगस्ट 2021 पासून सुरू होईल आणि 6 सप्टेंबर 2021 रोजी संपेल. यावर्षी श्रावण महिन्यात 5 सोमवार असतील.
प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवामूठीचे महत्त्वही वेगळे आहे.
पहिल्या सोमवारी तांदूळ
दुसऱ्या सोमवारी तीळ
तिसऱ्या सोमवारी मूग
चौथ्या सोमवारी जवस
आणि पाचव्या श्रावणी सोमवारी शिवामूठ म्हणून सातू वाहण्याची परंपरा आहे.
श्रावण सोमवारी उपवास ठेवून महादेवाची मनोभावे पूजा केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. आयुष्यातील सर्व कष्ट दूर होतात. भगवान शिव आणि माता पार्वती यांची एकत्र पूजा केल्याने सौभाग्य लाभते आणि आर्थिक समस्या दूर होतात अशी मान्यता आहे.