Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 23 March 2025
webdunia

Shravani Somvar Message In Marathi श्रावण सोमवार शुभेच्छा मराठी

shrawan somwar wishes
, रविवार, 24 जुलै 2022 (07:15 IST)
शिव हेच सत्य आहे, शिव सुंदर आहे 
शिव अनंत, शिव ब्रम्ह आहे
शिव आहे शक्ती आणि शिवच आहे भक्ती 
श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा!
 
श्रावणी सोमवारच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा
भगवान शंकराची कृपा आपणा सर्वांवर अशीच राहो ही सदिच्छा!
श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा!
 
ओम नमः शिवाय
बम बम भोले 
श्रावणी सोमवारच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
 
महादेवाला करू वंदन वाहू बेलाचे पान 
महादेवा सदैव सुखी ठेव माझ्या प्रियजनांना 
श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा!
 
श्रावण मासाला झाला प्रारंभ
करू शिवाच्या पूजेला आरंभ 
ठेऊ शिवाचे व्रत 
होईल श्रावणी सोमवार सुफळ संपूर्ण 
श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!
 
पवित्र श्रावणी सोमवारच्या
आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा
भगवान शंकराची कृपा आपणा सर्वांवर
अशीच राहो ही सदिच्छा!
 
ॐ नमः शिवाय हर हर महादेव
श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!
 
श्रावण सोमवार च्या शुभेच्छा
सर्व जग ज्याच्या शरणी आहे..
त्या भगवान शंकराला नमन आहे,
भगवान शंकराच्या चरणांची होऊया धूळ..
चला देवाला वाहूया श्रद्धेचं फूल…
हर हर महादेव
 
ज्याने घेतलं मनापासून शंकराचं नाव,
त्यावर शंकराने केला सुखांचा वर्षाव.
श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!
 
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् |
उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात् ||
श्रावण मास व श्रावण सोमवार च्या शुभेच्छा
 
दुःख दारिद्रय नष्ट होवो
सुख समृद्धी दारी येवो
या श्रावण सोमवारच्या
शुभ दिवशी तुमच्या सर्व
मनोकामना पुर्ण होवो.
 
शिव शंकराची शक्ती, शिव शंकराची भक्ती,
ह्या श्रावण सोमवारच्या पवित्र दिवशी,
आपल्या जीवनाची एक नवी आणि
चांगली सुरुवात होवो,
हीच शंकराकडे प्रार्थना…
श्रावण मासच्या हार्दिक शुभेच्छा!
 
ॐ मध्ये आहे आस्था..
ॐ मध्ये आहे विश्वा…
ॐ मध्ये आहे शक्ती..
ॐ मध्ये आहे सर्व संसार..
ॐ ने होईल दिवसाची चांगली सुरूवात..
जय शिव शंकर.
श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!
 
महाकाल महाकाल नावाची किल्ली
उघडेल तुमच्या नशिबाची खिडकी,
होतील सर्व कामे पुर्ण तुमची
श्री शिव शंकराची हिच महती,
ओम नमः शिवाय.
श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!
 
एक पुष्प….
एक बेलपत्र….
एक तांब्या पाण्याची धार…
करेल सर्वांचा उध्दार.
श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!
 
कैलासराणा शिव चंद्रागौळी 
फणीद्रं माथा मुकुटी झळाळी 
कारुण्यसिंधु भवदुःखहारी 
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥
श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!
 
हे देवाधिदेव महादेव आहेस
तू जगी सर्वश्रेष्ठ
तुझ्या आशीर्वादाने होते सर्व दुःख नष्ट,
तुझ्या कृपे शिवाय 
नाही आमच्या जीवनाचा उध्दार,
आम्हा भक्तांचा आहेस तू एकमेव आधार,
ओम नमः शिवाय.
श्रावण सोमवारच्या शुभेच्छा!

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हिंदू धर्मानुसार घरामध्ये चप्पल, बूट घालू नये