Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नकळतपणे वाट बघते मी रे श्रावणा, दरवर्षी तुझ्या येण्याची!

shrawan sari
, गुरूवार, 17 ऑगस्ट 2023 (18:31 IST)
असा कसा रे तू?मनस्वी अन चंचल,
लावतो जीवास घोर, पण तरीही अनमोल,
वर्षोनुवर्षे झालीत, तू येण्याची वाट बघते,
नाही गुंताव म्हणते, पण अधिक गुंतत जाते,
अंगावरचे तुषार आठवतात, तर कधी स्पर्श थंडगार,
भटकंती आठवते, तुझ्यावर होऊन केलेली स्वार,
उगीचच हसत असते मनोमन,  आलास की तू,
हवं असतं मज हेच सगळं, नको रे इतका गुंतू!
मोकळी कशी होऊ मी तुझ्या पाशातून,
वेड लावण्या येतोस, नेतोस मला माझ्यातून,
तुझा सहवास देऊन जातो तृप्ती, पूर्ण वर्षाची,
नकळतपणे वाट बघते मी रे श्रावणा, दरवर्षी तुझ्या येण्याची!
..अश्विनी थत्ते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Nag Panchami 2023 नागपंचमी कधी साजरी होणार, तिथी, पूजा पद्धत, शुभ मुहूर्त आणि पदार्थांची संपूर्ण यादी