Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्रीदेवीचे निधन: राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधानांसह अनेकांनी दिली श्रद्धांजली

webdunia
मी त्यांच्या निधानाची बातमी ऐकून स्तब्ध आहोत. आपल्या लाखो चाहत्यांचे हृदय तोडत ती निघून गेली. तिचे अभिनय नेहमीच दुसर्‍या कलाकारांसाठी प्रेरणादायक ठरेल. माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंब आणि जवळीक लोकांसोबत आहे.
-रामनाथ कोविंद
राष्ट्राध्यक्ष
 
प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांच्या आकस्मिक निधनामुळे दुखी आहोत. त्या दिग्गज कलाकार होत्या ज्यांच्या करिअरमध्ये विविध भूमिका आणि अविस्मरणीय अभिनय सामील आहे. या दुःखाच्या काळात त्यांच्या कुटुंब आणि चाहत्यांसोबत माझ्या संवेदना आहेत. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो
-नरेंद्र मोदी
पंतप्रधान
 
वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी बालकलाकार म्हणून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलेल्या श्रीदेवी यांनी गेल्या अर्धशतकी कारकीर्दीत हिंदीसह विविध भाषांमधील चित्रपटांतून अतिशय वैविध्यपूर्ण भूमिका तितक्याच समर्थपणे साकारल्या होत्या. विशेषतः: सदमा, चांदणी, लम्हें यासारख्या चित्रपटांपासून ते अलीकडच्या इंग्लिश विंग्लिशपर्यंतच्या अनेक चित्रपटातील त्यांच्या भूमिका निश्चितच दीर्घकाळ स्मरणात राहतील. अभिनय, सौंदर्य आणि कलानिपुणता यांचा अनोखा संगम असलेल्या श्रीदेवी यांनी रुपेरी पडद्याला खऱ्या अर्थाने ग्लॅमर प्राप्त करून दिले होते
-देवेन्द्र फडणवीस
सीएम, महाराष्ट्र
 
भारताची प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांच्या आकस्मिक निधनाची बातमी ऐकून मी दुखी आणि स्तब्ध आहे. श्रीदेवी अविश्वसनीय प्रतिभावान आणि बहुमुखी प्रतिभेची धनी कलाकार होती, ज्यांचे काम अनेक शैली आणि भाषांमध्ये प्रसिद्ध होते. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो.
राहुल गांधी
 
चांगली मैत्रीण गमावली- रजनीकांत
 
मी स्तब्ध आहे. स्वत:ला रडण्यापासून रोखू शकत नाही- सुष्मिता सेन
 
वाईट बातमीनं जाग, विश्वास बसत नाही- अनुपम खेर
 
ही बातमी ऐकून किती मोठा धक्का बसलाय हे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही - अक्षय कुमार
 
माझ्याकडे शब्दच नाही, मी स्तब्ध आहे- अनुष्का शर्मा
 
बॉलीवूडचा चमकता तारा निखळला- फराह खान
 
श्रीदेवी यांनी जगाचा निरोप घेतला यावर विश्वासच बसत नाही- अजय देवगण
 
श्रीदेवी नावाचे एक पर्व संपले, एका सुंदर कथेचा अंत झाला आहे यावर विश्वास बसत नाही- शेखर कपूर

Share this Story:

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

व्हॅलेंटाईन डे विरोधी