Publish Date: Mon, 26 Feb 2018 (08:10 IST)
Updated Date: Mon, 26 Feb 2018 (10:54 IST)
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचे दुबईत कार्डिअॅक अरेस्टने निधन झाले. सोमवारी सकाळी त्यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत. श्रीदेवी यांच्या पार्थिवावर आज सकाळी 11 वाजता मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत. दुबईहून त्यांचे पार्थिव शरीर आज रात्री 9 वाजता मुंबईत येण्याची शक्यता आहे. दुबईमध्येचे त्यांचे पोस्टमॉर्टम केले गेले.
सूत्रांच्या माहितीनुसार, शनिवार रात्री 11 वाजता श्रीदेवी हॉटेलच्या बाथरूममध्ये पडल्या. त्यानंतर त्यांना तात्काळ राशिद रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. दुबईतील प्रसिद्ध जुमेराह इमीरात हॉटेलमध्ये त्या थांबल्या होत्या. श्रीदेवी या आपल्या कुटुंबियांसोबत एका विवाह सोहळ्यासाठी दुबईला गेल्या होत्या. श्रीदेवींच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूडवर विश्वावर शोककळा पसरली आहे. अनेकांना या बातमीने धक्का बसला आहे.