Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गुरु गोविंद सिंग जयंती विशेष

गुरु गोविंद सिंग जयंती विशेष
, बुधवार, 20 जानेवारी 2021 (07:35 IST)
-हरदीप कौर
श्री गुरु गोविंद सिंह हे शीख धर्माचे दहावे गुरू होय. त्यांचा जन्म 1666 मध्ये पाटना येथे गुजरीजी व श्री गुरु तेगबहादुरजी यांच्या गरीब कुटुंबात झाला. त्यावेळी गुरु तेगबहादुरजी बंगालमध्ये होते. त्यांच्या म्हणण्यानुसार गुरुजी यांचे नाम गोविंद राय असे ठेवण्यात आले होते. नंतर 1699मध्ये बैसाखीच्या दिनी गुरु गोविंद राय हे गुरु गोविंद सिंह बनले होते. त्यांचे बालपणाचे पाच वर्ष पाटना येथेच गेले.
 
1675मध्ये कश्मीरच्या ब्राम्हणांच्या विनंतीला मान देऊन श्री गुरु तेगबहादुरजींनी दिल्ली येथील चांदणी चौकात देहत्याग केला होता. श्री गुरु गोविंद सिंहजी 11 नोव्हेंबर 1675 रोजी गुरु गादीवर विराजमान झाले.
 
धर्म व समाजाच्या संरक्षणासाठी गुरु गोविंद सिंहजी यांनी 1699 मध्ये खालसा पंथाची स्थापना केली. खालसा पंथाच्या माध्यमातून त्यांनी जातीय भेद नष्ट करून समानता प्रस्तापित केली. शीख बांधवामध्ये आत्म-सन्मानाची भावना वाढीस लावली.
 
गुरु गोविंद सिंह यांना तीन पत्नी होत्या. माता जीतोजी, माता सुंदरीजी व माता साहिबकौरजी अशी त्यांची नावे होती. बाबा अजित सिंह, बाबा जुझार सिंह ही त्यांची मुले होती. ती चमकौरच्या युद्धात शौर्यमरण प्राप्त झाले होते. तर बाबा जोरावर सिंह व फतेह सिंह या लहान मुलांना सरहंदच्या नवाबने जिवंत भिंतींत पुरले होते. केसगड, फतेहगड, होलगड, आनंदगड व लोहगड हे किल्ले त्यांनी युद्धात जिंकले होते.
 
गुरुजी दररोज गुरूवाणीचे पठण करून आपल्या भक्तांना त्याचा सविस्तर अर्थही सांगत असत. तेव्हा त्यांचे लहान भाऊ मनी सिंहजी ते लिहीत असत. सलग पाच महिने लिहून गुरुवाणी पूर्ण झाली होती.
 
गुरु गोविंद सिंहजी यांनी 42 वर्षापर्यंत शत्रूविरुद्ध सामना केला होता. 1708 मध्ये त्यांनी महाराष्ट्रातील नांदेड येथील सचखंडमध्ये आपला देह त्यागला होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चाणक्य नीती : अशा स्त्रियांपासून नेहमी लांब राहावे