मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये एका महिन्यापर्यंत चालणार्या सिंहस्थ (कुंभ) मेळ्याचे दुसरे शाही स्नान सोमवारी पहाटे सुरू झाले आहे. या शाही स्नानाची सुरुवात करत जुना अखाडाच्या नागा साधूंनी हर-हर महादेवाचा जल्लोष करत पवित्र शिप्रेत प्रवेश केला. सूर्योदयाच्या आधीपासून ते दुपारपर्यंत साधूंच्या शाही डुबकीसाठी रामघाटाला तयार केले आहे. स्नानात भाग घेण्यासाठी भाविकांचा सैलाब येथे आलेला आहे. हा स्नान आज अक्षय तृतीया असल्यामुळे अधिक शुभ मानला जात आहे. असा अंदाज लावण्यात येत आहे की किमान 25 लाख भाविक या प्राचीन नगरीत आलेले आहे.
9 may shahi snan-alok anu
स्नानाची सुरुवात जुना आखाड्याचे पुजारी हरी गिरी द्वारे रामघाटावर पूजा अर्चनासमेत झाली. सिंहस्थ मेळ्यात सामील होण्यासाठी देशाच्या वेग वेगळ्या भागातून लोक या पवित्र शहरात आलेले आहे.
कुंभच्या या मेळ्याचे आयोजन दर 12 वर्षांनंतर केले जाते. उज्जैनला देशातील 12 ज्योतिर्लिंगांमधून एक आणि महाकालेश्वरचे निवास म्हणून ओळखले जाते.
shahi snan- photo Bhika sharma
shahi snan- dharmendra sangle
एका नंतर एक साधूंचे सर्व 13 आखाडे स्नान करतील. यासाठी शिप्रा नदीच्या काठावर व्यवस्था करण्यात आली आहे. यंदा, मेळ्या क्षेत्रात किन्नरांनी देखील आपला आखाडा बनवला आहे आणि त्यांनी शहरात एक जुलूस देखील काढला होता. या जुलुसाचे लोकांनी भव्य दिव्य स्वागत केले होते.