Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रत्नमंजरी

रत्नमंजरी

वेबदुनिया

रत्नमंजरी कथा सांगू लागली-
PR
PR
''अंबावती राज्यात राजा गंधर्वसेन राज्य करीत होता. त्याला चार वर्णाच्या राण्‍या होत्या. ब्राह्मण पत्नीने ब्रह्मवीत, क्षत्रीय पत्नीने शंख व विक्रम, वैष्णव पत्नीने चंद्र तर शूद्र पत्नीने धन्वंतरी नामक पुत्राना जन्म दिला होता.

गंधर्वसेनने ब्रह्मवीतला आपला प्रधान बनविला. परंतु तो आपली जबाबदारी उत्तम रितीने पार पाडू शकला नाही. काही दिवसातच त्याने राज्यातून पळ काढला. बर्‍याच दिवसांनतर परत येत असताना वाटेतच त्याचा मृत्यु झाला.

इकडे क्षत्रीय पत्नीचा मोठा मुलगा शंखाने राजा गंधर्वसेन झोपला असताना त्याचा वध केला व तो स्वयंघोषित त्याचा उत्तराधिकारी बनला. नंतर त्याने एक-एक करून विक्रमास आपल्या भावांचाही वध केला. बरेच दिवस गेल्यानंतर एका जंगलातील झोपडी विक्रम रहात आहे, अशी गुप्त माहिती शंखाला मिळाली. एका मांत्रिकाच्या मदतीने त्याने विक्रमला मारण्याची योजना आखली. योजनेनुसार मांत्रिकाला राजा विक्रमास देवी भगवतीसमोर नतमस्तक करून शंख तलवारीने त्याची मान कापणार होता. मात्र विक्रमाने पराक्रमी व चतुर होता. त्याने आधीच आपल्या भावाचे षडयंत्र ओळखले होते. मांत्रिकास नतमस्तक कसे करावे? हा विधी करून दाखविण्यास सांगताच शंखने त्यास विक्रम समजून हत्या करून टाकली. नंतर राजा विक्रमने शंखच्या हातून तलवार हिस्कावून त्याचे धड त्याच्या मानेपासून वेगळे करून टाकले. शंखच्या मृत्युनंतर पुन्हा विक्रम राजा झाला.

एक दिवशी राजा विक्रम जंगलात शिकारीसाठी आला होता. शहामृगाचा पाठलाग करत असताना तो आपल्या सहकार्‍यांपासून भटकला. त्यानंतर राजा विक्रमाची तूतवरणशी भेट झाली. तो राजा बाहुबल यांचा प्रधान होता. विक्रमला तो राजाच्या महालात घेऊन गेला. तूतवरणने राजाला विक्रमाची सारी हकिकत सांग‍ितली. राजा बाहुबल विक्रमवर प्रसन्न होऊन त्याचा राजतिलक केला. भगवान शिवद्वारा सूवर्ण सिंहासन त्याला देऊन टाकले. कालांतराने विक्रमादित्य चक्रवर्ती सम्राट बनला व त्याची कीर्ति पताका सर्वत्र फडकू लागली.''

Share this Story:

Follow Webdunia marathi