Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सिंहासन बत्तिशीची कथा क्र.2 (चित्रलेखा)

सिंहासन बत्तिशीची कथा क्र.2 (चित्रलेखा)

वेबदुनिया

, गुरूवार, 9 मे 2013 (11:58 IST)
PR
PR
चि‍त्रलेखा कथा सांगु लागली....

एके दिवशी राजा विक्रमादित्य शिकार करण्यासाठी जंगलात गेला होता. जंगलात एक तपस्वी तपश्चर्या करीत होता. राजाने आदरपूर्वक त्या तपस्वीला नमस्कार केला. राजाची विनम्रता पाहून तपस्वी त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला एक फळ दिले व सांगितले, ''जो कोणी हे फळ खाईल तो तेजस्वी व यशस्वी पुत्राला जन्म देईल.''

राजा विक्रमाचे आपल्या राणीवर जिवापाड प्रेम होते. त्याने ते फळ आपल्या राणीला देऊन टाकले. परंतु राणी चरित्रहीन होती. तिचे कोतवालावर प्रेम होते. तिने ते फळ कोतवालाला दिले. मात्र कोतवाल एका वेश्येच्या नादात पडला होता. त्याने ते फळ त्या वेश्येस देऊन टाकले. वेश्येचे विचार केला- ''आपला मुलगा कितीही यशस्वी झाला, परंतु त्याला प्रतिष्ठा कोण देणार?'' म्हणून तिने ते फळ राजा विक्रमादित्य यास देऊन टाकले. 'ते' पाहून राजाला आश्चर्याचा धक्का बसला. नंतर अधिक चौकशी केल्यानंतर कोतवाल व राणी यांच्यातील अवैध संबंध राजाला कळले. राजाचा आपल्या राणीने विश्वास घात केल्याने त्याला फार वाईट वाटले. नंतर राजा कठिन तपश्चर्या करण्यासाठी हिमालयात निघून गेला.

राजाच्या गैरहजेरीत राज्याचे रक्षण करण्यासाठी देवराज इंद्राने एक शक्तिशाली देव पाठविला. काही दिवसानंतर विक्रमादित्य आपल्या राज्यात परतला. राजाचा मागील जन्मातील शत्रू परत आला आहे, असे देवाने राजाला सांगितले. राजाला वध करण्याच्या इराद्यानेच तो येथे आला आहे. सध्या तो तपश्चर्या करीत आहे.

राजाच्या राणीने विष प्राशाण करून आत्महत्या केली होती. विक्रमाने राजपाट सांभाळण्यास सुरवात केली. काही दिवसांनंतर तो शत्रू दरबारात येऊन पोहचला. त्याने राजाला एक फळ दिले. त्या बदल्यात राजाने त्यास खूप धन दिले. राज्यांच्या कल्याणासाठी एक विधी करण्याचे त्याने राजाला सांग‍ितले. राज्याने ते मान्य केले. विधी करण्‍यासाठी ते दोघेजण स्मशानात गेले. या विधीसाठी एका वेताळाची आवश्यकता असल्याचे योगीने राजाला सांगितले. योगीच्या विधीसाठी राजा विक्रम स्मशानातील एका झाडाला लोंबळत असलेल्या वेताळाला घेण्‍यासाठी गेला.

विक्रम हा पराक्रमी होता. वेताळ राजाचा मौनभंग करून वेताळ राज्याच्या खांद्यावरून चौवीस वेळा पळून गेला. मात्र राजाने चिकाटी सोडली नाही. परंतु राजाचा प्रामाणिकपणा पाहून वेताळ राजावर खूष होऊन त्याने योगी दुष्ट असल्याचे राजाला सांग‍ितले. सिध्दी प्राप्त करण्‍यासाठी तो आज राजाचा बळी देणार आहे, हे राजाचा वेताळकडून कळले.
webdunia
PR
PR


विक्रमाला तात्काळ इंद्र देवची आकाशवाणी लक्षात आली. त्याने वेताळाचे आभार मानले. नंतर राजा वेताळला खांद्यावर घेऊन योगीकडे घेऊन आला. योगी राजाची वाट पहात बसला होता. राजाला पाहताच तो दुष्ट योगी आनंदीत झाला. त्याने विक्रमास देवी चरणी साष्टांग नमस्कार करण्‍यास सांगितले. मात्र साष्टांग नमस्कार कसा करावा? हे राजाने विचारल्यावर योगी देवीसमोर साष्टांग नमस्कार करण्यासाठी झुकला तेवढ्यात राजा विक्रमने आपल्या तलवारीने योगीची मान कापली. देवीला बळी दिला गेल्याने ती प्रसन्न झाली. तिने विक्रम राजाला सेवक म्हणून दोन वेताळ दिले. स्मरण करताच राज्याच्या सेवेसाठी दोघे वेताळ हजर होतील, असा त्याला वर दिला. देवीचा आशिर्वाद घेऊन राजा राज्यात पर‍तला व राज्य करून लागला.

Share this Story:

Follow Webdunia marathi