साहित्य : 2 कप स्वीट कॉर्न उकळलेले, 1/2 कप तेल, 1/2 कप बदाम काप, 3/4 अक्रोडाचे तुकडे, 1/2 चमचा लिंबाचा रस, 2 मोठे चमचे हिरवी कोथिंबीर चिरलेली, मीठ 3/4 चमचे, 1/2 चमचा काळे मीरे पूड.
कृती : एका सॉस पॅनमध्ये तेल गरम करून त्यात स्वीट कॉर्न मिसळावे आणि चांगल्या प्रकारे हालवून फ्राय करावे. नंतर त्यात मीठ, हिरवी मिरची, बदाम व अक्रोड टाकावे. मंद आचेवर सोनेरी होईपर्यंत फ्राय करावे. हिरवी कोथिंबीर, लिंबाचा रस व काळेमिरे पूड घालून गॅसवरून खाली उतरून गरम गरम सर्व्ह करावे.