साहित्य : दोन वाट्या तांदूळ, अर्धी वाटी मुगाची डाळ, पाव वाटी चण्याची डाळ, दीड वाटी गूळ, एक नारळ, किंचित मीठ, वेलदोडे.
कृती : मुगाची डाळ थोडीशी भाजून व चण्याची डाळ तांबूस होईपर्यंत भाजून घ्यावी. नंतर तांदूळ व दोन्ही डाळी पाणी घालून शिजवाव्यात व शिजल्यावर जरा घोटून घ्याव्यात. खोबरे जरा वाटून घेऊन त्यात घालावे व गूळ, वेलदोड्यांची पूड व किंचित मीठ घालून पुन्हा शिजवावे व मऊ भाताइतपत करावे. शिजताना थोडे तूप सोडावे. या पदार्थाला गुळाएवजी आपण साखर टाकूनसुद्धा बनवू शकतो.