Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सोया वडी

सोया वडी
साहित्य : 100 ग्रॅम सोयाबीनच्या वड्या, 2 मोठे चमचे तेल, 1-2 तेजपान, 2 चमचे धने पूड, साबूत लाल मिरच्या 4-5, 2 मोठे कांदे चिरलेले, 1-1 चमचा आलं-लसणाचे पेस्ट, 50 ग्रॅम टोमॅटो प्युरी, 1 चमचा तिखट, मीठ चवीनुसार.

कृती : सर्वप्रथम सोयावडीच्या तुकड्यांना कोमट पाण्यात 15 मिनिट भिजत ठेवावे. कढईत तेल गरम करून त्यात तमालपत्र, धने पूड व तिखट घालून शिजवावे. नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्यावे. त्यात आलं-लसणाचे पेस्ट, टोमॅटो प्युरी, तिखट व मीठ घालून चांगले परतून घ्यावे. सर्वात शेवटी सोया वडी घालून चांगले शिजवून घ्यावे. वरून साबूत लाल मिरच्या व कोथिंबीर घालून सर्व्ह करावी.

Share this Story:

Follow Webdunia marathi