Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कांचीपुरम इडली

कांचीपुरम इडली
साहित्य : २ वाट्या उकडा तांदूळ, १ वाटी उडीद डाळ , अर्धी वाटी चणा डाळ, पाव चमचा हिंग, १ चमचा काळी मिरी, १ टी. स्पून जीरे थोडे आले किसून, थोडा कढीलिंब, थोडे काजूचे तुकडे, चवीनुसार मीठ
 
कृती : सर्वप्रथम तांदूळ, उडदाची डाळ, चणा डाळ रात्री भिजत घालून सकाळी वाटून पीठ आंबायला ठेवावे. जीरे व मिरे जाड कुटून, हिंग, मीठ पिठात घाला. थोडे तेल गरम करुन काजू तुकडे व कढीलिंब तळून तेलासकट पिठात घाला. आले किसून टाकून पीठ खूप फेटावे. पीठ फेटून ईडली स्टॅंडवर इडल्या वाफवून घ्याव्यात. चटणीबरोबर सर्व्ह कराव्यात.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दुधी भोपळ्याचा रस प्यायचा की नाही