Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अविअल

नारळ व दह्यातील भाजी

अविअल
ND
साहित्य : 2 1/2 कप नारळ खवलेला, 12 हिरव्या मिरच्या, 2 छोटे चमचे जिरे, 2 कप पाणी, 1 1/2 कप आंबट दही घुसळलेले, 400 ग्रॅमसुरण लांब चकत्या केलेल्या, 400 ग्रॅम कोहळा सोलून जाड चकत्या केलेल्या, 3 मध्यम कच्ची केळी जाड चकत्या केलेल्या, 3 शेवग्याच्या शेंगा सोलून लांबीचे तुकडे केलेले, 1/4 किलो लाल भोपळा जाड चकत्या केलेल्या, 100 ग्रॅम पापडी लांब तुकडे केलेली, 5 छोटे चमचे मीठ, 3/4 छोटा चमचा हळद पूड, 2 काड्या कढी पत्ता, 3 मोठे चमचे खोबरेल तेल.

कृती : सर्वप्रथम मिरच्या आणि जिरे यांचे, थोडे थोडे पाणी घालून पेस्ट तयार करावी. दही घालून चांगले मिक्स करावे. उरलेले पाणी कुकरामध्ये घालून त्यात नारळाचा कीस, कढी पत्ता व तेल सोडून बाकी सर्व साहित्य टाकून चांगले ढवळा. 5 मिनिटाने कुकरबंद करावे. थंड झाल्यावर त्यात नारळाचा कीस व कढीपत्ता घालावा व एकजीव करावे. नंतर 2 मिनिट शिजत ठेवावे गरम गरम वाढावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi