साहित्य : कैरीच्या फोडी (साल काढून) दीड वाटी, दाण्याचा कूट पाव वाटी, तिळाचा कूट पाववाटी, गूळ पाऊण वाटी, आले लसूण पेस्ट अर्धा चमचा, काळा मसाला 1 चमचा, तिखट, मीठ, हळद अंदाचे पाव चमचा मेथ्या, फोडणीसाठी तेल, जिरं, हिंग कढीपत्ता.
कृती : सर्वप्रथम कढईत तेल जिरं व मेथ्या घाला. मेथ्या लालसर रंगावर येऊ द्या. कढीपत्ता व हिंग घाला, आले लसूण पेस्ट घाला परता, कैरीच्या फोडी घाला तेलावर चांगल्या लालसर परतून घ्या. तिखट, मीठ, हळद काळा मसाला घाला, परता थोडे पाणी घाला, दाण्याचा कूट, तिळाचा कूट व गूळ घाला. चांगले शिजू द्या. घट्टसर कायरस 3 ते 4 दिवस टिकतो.