Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इडली - शेवया

इडली - शेवया
ND
साहित्य : 1 वाटी जाडसर शेवया, 1/4 वाटी जाडसर रवा, 2 सिमला मिरच्या, 1 वाटी दही, 1/2 वाटी पाणी, 1 चमचा ईनो फ्रूट साल्ट, 1/2 चमचा साजुक तूप, मीठ चवीनुसार.

फोडणीचे साहित्य : 1 चमचा मोहरी, 8-10 गोड लिंब , 4 मिरच्या लांब लांब काप केलेल्या, 1 चमचा तेल.

कृती : सर्वप्रथम शेवयांचे बारीक बारीक तुकड्यांना सोनेरी होईपर्यंत तुपात भाजून घ्यावे, सिमला मिरचीचे बारीक बारीक काप करावे. इडली तयार करण्या 1 तास अगोदर दह्याला पाण्यासोबत मिसळून एकजीव करून त्यात शेवया आणि रवा मिसळून ठेवावे. जेव्हा मिश्रण फुगून येईल तेव्हा त्यात इनो आणि मीठ घालून 5 मिनिट एकाच दिशेत फिरवावे. नंतर या मिश्रणात सिमला मिरची घालून इडलीच्या पात्रात तेलाचा हात लावून त्यात हे मिश्रण ओतावे व 20 मिनिट कमी आचेवर शिजवावे. गार झाल्यावर त्याचे चार तुकडे करावे. गरम तेलात मोहरी, गोडलिंब आणि हिरवी मिरची घालून फोडणी द्यावी. चटणी किंवा सॉस सोबत सर्व्ह करावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi