साहित्य : केळ्याचे पीठ एक वाटी, साबूदाणा व वर्याचे तांदूळ शेंगदाण्याचे कूट , मीठ, ओल्या मिरच्या किंवा लाल तिखट, जिरे, कोथिंबीर, तूप.
कृती : कच्ची केळी घेऊन, त्यांची साल काढून टाकून, त्यांच्या चकत्या कराव्यात व त्या उन्हात वाळवाव्यात. नंतर दळून पीठ करावे. पीठ बरणीत भरून ठेवावे. एक वाटी केळ्याचे पीठ घेऊन त्यात अर्धी वाटी दाण्याचे कूट घ्यावे. भाजणी व कूट एकत्र करावे. चवीप्रमाणे मीठ, ओल्या मिरच्या व जिरे वाटून घालावे. कोथिंबीर चिरून घालावी. नंतर पिठात पाणी घालून, पीठ मळून घ्यावे व तव्यावर तूप घालून थालीपीठ लावावे. वर झाकण ठेवावे. थालीपीठ मंद भाजावे.