Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोझी कुट्टान

कोंबडीचा रस्सा-केरळीय पद्धत

कोझी कुट्टान
साहित्य : 1 किलो कोंबडीचे तुकडे, 1 छोटा चमचा हळद, 3 चमचे मीठ, 1 चमचा दही, 2 कप नारळ खवलेला, 2 कप पाणी, 3 मोठेचमचे खोबरेल तेल, 7 अख्ख्‍या सुक्या मिरच्या, 7 ग्रॅम आले, 12 पाकळ्या लसूण, 1 चमचा बडीशोप, 1 तुकडा दालचिनी, 7 लवंगा, 2 हिरव्या वेलच्या, 4 चमचे धणे, 1/2 चमचा जिरे, 1 कांदा चिरलेला, 1 हिरवी मिरची, 1 टोमॅटो शिजवून गाळलेला रस.

ND
कृती : कोंबडीच्या तुकड्यांना 1 चमचा हळद, 1 छोटा चमचा मीठ आणि दही चोळून बाजुला ठेवा. 3/4 कप पाणी घेऊन नारळाचे 1 कप जाड दूध काढा. तव्यावर 1 चमचा तेल गरम करून त्यात कांदा, हिरवी मिरची आणि टोमॅटो रस सोडून सर्व पदार्थ भाजा. भाजलेल्या पदार्थांचे अधूनमधून थोडे पाणी घालून पेस्ट करा. उरलेले तेल कुकरमध्ये गरम करून त्यात कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परता. उरलेली हळद पूड, पेस्ट, मिरच्या आणि टोमॅटो रस घाला. सतत ढवळत रहा साधारण 2 मिनिटे शिजवा. कोंबडी आणि उरलेले मीठ घाला. चांगले मिसळा, नारळाचे दूध घालून ढवळा. व 5 मिनिटे शिजवा. व गरम गरम सर्व्ह करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi