Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

खीरा कॉकटेल कटस

खीरा कॉकटेल कटस
PR
साहित्य : 2 काकड्या, 1/2 कप दही, 2 चमचे गाजर व पनीराचा कीस, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, 1/4 चमचा काळ्या मिऱ्याची पूड, पुदिन्याची पानं, मीठ चवीनुसार.

कृती : काकडीला सोलून त्याचे दोन-दोन इंचीच्या आकाराचे काप करावे व प्रत्येक फोडीच्या आतील बिया काढून घ्याव्या. दह्यात पनीर, हिरव्या मिरच्या, काळे मिरे, किसलेली गाजर व मीठ मिसळावे. या मिश्रणाला काकडीच्या तयार केलेल्या कटसमध्ये भरून 15 मिनिट फ्रीजमध्ये ठेवावे. पुदिनाची पानं प्रत्येक कपामध्ये सजवून सर्व्ह करावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi