Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चवळीची उसळ

चवळीची उसळ
WD
साहित्य : 1 कप चवळी रात्रभर ‍पाण्यात भिजवून किंवा गरम पाण्यात 1 तास भिजवून निथळून घेतलेली, 2 कप पाणी, पाव चमचा गरम मसाला पूड, 2 ग्रॅम आले, 3 पाकळ्या लसूण, 2 मोठे चमचे तेल, 1 कांदा किसलेला, 1 टोमॅटो कापलेले, 1/2 चमचा हळद पूड, 1/2 चमचा तिखट, 2 चमचे मीठ, 1 चमचे धणे पूड, 1/2 चमचा जिरे पूड.

कृती : आले आणि लसणाचे वाटण करून घ्या. तेल कुकरमध्ये 2 मिनिटे गरम करा त्यात कांदा घाला आणि तो गुलाबी होईपर्यंत परता. आले-लसणाचे वाटण टाका. ढवळा आणि काही सेकंद परता. त्यात चवळी, पाणी आणि गरम मसाला सोडून बाकी सर्व साहित्य घाला. टोमॅटोचा लगदा होईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत अधूनमधून ढवळत रहा. चवळी घालून 5 मिनिटे शिजू द्या. गरम मसाला टाकून गरम गरम सर्व्ह करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi