Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चिंचेचा भात

चिंचेचा भात
MHNEWS
साहित्य : २ वाट्या शिजवून, मोकळा करून भात, अर्धा छोटा चमचा हळद, जिरे, हिंग, मोहरी, मीठ, १ चमचा चणाडाळ (हरभरा), (भिजत घालावी), १ चमचा उडीद डाळ, १ चमचा मसूर डाळ (भिजत घालावी),२-३ हिरव्या व लाल मिरच्या, अर्धा चमचा किसून आले, ५-७ पाने कढीपत्ता, सजविण्यासाठी कोथिंबीर, भिजवून १/४ वाटी दाणे (सालासकट), अर्धी वाटी चिंचेचा कोळ (थोडा गूळ घालून), तेल ४-५ चमचे.

कृती : प्रथम भात मोकळा शिजवून एका पसरट परातीत ठेवावा. मीठ घालावे. एका कढईत तेल गरम करावे. क्रमाक्रमाने एक एक साहित्य घालावे. हिंग, मोहरी, जिरे, लाल मिरच्या, कढीपत्ता व हळद घालावी. तयार फोडणीत उडदाची डाळ घालावी व ती परतून घ्यावी. त्यामध्ये तयार गूळ घातलेला चिंचकोळ घालावा व भिजत घातलेली डाळ (हरबरा, मसूर) घालावी. १/४ भांडे / चारच चमचे पाणी घालून उकळावे व तयार झालेली फोडणी भातावर घालीवी. चवीनुसार मीठ घाला. वरून कोथिंबीर सजवून भात वाढावा. वरून भिजलेले दाणे घालावे.

साभार : महान्यूज

Share this Story:

Follow Webdunia marathi