साहित्य : 2 वाटी पिकलेली चिंच गर काढून, त्याच्या दीड ते 2 पट साखर, तिखट, मीठ अंदाजे, अर्धा चमचा मिरेपूड.
कृती : उकळत्या पाण्यामध्ये चिंच रात्रभर भिजू द्या. चांगली कुस्करून काडक्षकचरा काढून तारेच्या चाळणीवर गाळून घ्या. चिंचेचा कोळ व साखर किंवा गूळ मिसळून शिजतानाच तिखट, मीठ, मिरेपूड गाला व घट्ट होईपर्यंत शिजवून घ्या.
घट्ट शिजवून वेळेवर थोडे गरम पाणी घालून आपण वापरू शकतो. बटाटा वडा, थालीपीठ, भजी या सर्वांसोबत ही चटणी चटकदार वाटेल.