साहित्य : 3 वाटी उकडलेल्या नुडल्स, थोड्या पाण्यात तेल व मीठ घालून उकळू द्या. पाणी उकळल्यावर नुडल्स गाला व दोन उकळ्या आल्यावर 10 मिनिटे झाकण ठेवा. गॅस बंद करा, थंड पाणी सोड़न चाळणीवर गाळून घ्या.
इतर साहित्य : पाव वाटी गाजर पातळ चिरून, पाव वाटी सिमला मिरची पातळ चिरून, 1 वाटी पान कोबी पातळ चिरून, कांदा, लसणाची पेस्ट, जिरे पूड अर्धा चमचा, मीठ चवीनुसार, पाऊणवाटी चिंचेचा कोळ, पाव वाटी गूळ.
कृती : सर्वप्रथम कढईत तेलावर कांदा व लसूण परतून घ्या. भाज्या घाला व परता चिंचेचा कोळ व गूळ घाला, मिरेपूड व मीठ घाला. चांगले परतून शिजवलेल्या नुडल्स घाला. हलवून एक वाफ येऊ द्या. आंबट गोड चवीच्या नुडल्स मुलं आवडीने खातील.