साहित्य : 1 कप तांदुळाचे पीठ, 1/2 मैदा, 1 मोठा चमचा लोणी, 1 कप गूळ, 1/4 कप नारळाचा कीस, 1 केळ (कुस्करलेलं), 1/4 लहान चमचा वेलची पूड, 1 चमचा तूप, 1 चिमूटभर सोडाबायकार्ब.
कृती : 2 कप पाणी गरम करून त्यात गूळ घालावा व तो विरघळल्यावर त्यात तांदळाचे पीठ, मैदा, सोडा बायकार्ब, वेलची पूड नारळाचा भुरा व कुस्करलेलं केळ टाकून ते मिश्रण एकजीव करावे. अप्पमच्या पात्राला तूप लावावे, प्रत्येक पात्रात अर्ध भरेपर्यंत मिश्रण टाकावे. सोनेरी होईस्तोर त्याला शिजवावे. नैय्यपम फुगून येतील. त्यांना गरम गरम सर्व्ह करावे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा