हिरव्या मसाल्याचे मटण - मंगलोर पद्धत
साहित्य : 1 कप पाणी, दीड किलो मटण लेग तुकडे केलेले, 4 छोटे चमचे मीठ, 2 मोठे टोमॅटो चिरलेले, 1 छोटा चमचा हळद, 2 छोटे चमचे जिरे, 1 मोठा चमचा खसखस, 4 लवंगा, 1 हिरवी वेलची, दालचिनी 4 तुकडे, 10 काळी मिरी, 10 ग्रॅम चिंच बिया काढलेली, 3/4 कप कोथिंबीर कापलेली, 8 हिरव्या मिरच्या, 24 पाकळ्या लसूण, 15 ग्रॅम आले, 3 मोठे कांदे चिरलेले, 3/4 नारळ खवलेला, 1 कप तेल.
कृती : तव्यात 1 मोठा चमचा तेल गरम करून त्यात नारळ गुलाबी होईपर्यंत परता आणि काढा. पुन्हा 1 चमचा तेल घालून कांदा गुलाबी होईपर्यंत परता आणि काढा. हळद पूड, टोमॅटो, मीठ आणि मास हे सोडून कांदा, नारळ आणि इतर सार्या पदार्थांचे अधून मधून थोडे पाणी घालून पेस्ट तयार करा. उरलेले तेल कुकरमध्ये गरम करून त्यात ही पेस्ट घाला आणि 5 मिनिटे परता. हळद पूड टोमॅटो आणि मीठ घाला. टोमॅटोचा लगदा होईपर्यंत शिजवा. मांस घाला. चांगले मिसळा. उरलेले पाणी घाला. एकदा ढवळा. कुकर बंद करून 15 मिनिटे शिजवा. कुकर थंडझाल्यावर, गरम गरम सर्व्ह करा.