फिलिंग साठी : 400 ग्रॅम ताजे क्रीम, 500 ग्रॅम आयसिंग शुगर, 100 ग्रॅम चेरी, 50 ग्रॅम चॉकलेट आणि 6 चेर्या सजावटी साठी व 2 चमचे चेरी सिरप.
कृती : बटर व कस्टर्ड मिल्क फेटून घ्यावे. त्यात मैदा, बेकिंग पावडर, कोको पावडर आणि सोडा घालून चांगले फेटावे. नंतर त्यात दूध घालून फेटून घ्यावे. केकपात्राला तुपाचा हात लावून चारी कडे मैदा पसरवून त्यात मिश्रण ओतावे. 190 डिग्री सें. वर 25 मिनिटापर्यंत केक बेक करावी. ताजी क्रीम एका भांड्यात घ्यावी त्यात साखर व इसेंस घालून 3 ते 4 तासांसाठी थंड करायला ठेवावी. नंतर त्याला चांगले फेटून घ्यावे. केक चे दोन भाग करावे. खालचा भाग चेरी सिरपमध्ये बुडवून त्यावर ताज्या क्रीमचे 1/3 भाग आणि काप केलेल्या चेरीचे तुकडे पसरावे. आता वरच्या भागालासुद्धा सिरपमध्ये बुडवून उरलेले क्रीम त्यावर पसरवावे. केकला चेरी आणि चॉकलेटने सजवावे. दोन तास थंडकरून सर्व्ह करावे.