Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भेंडीचा पिवळा रस्सा

भेंडीचा पिवळा रस्सा
MHNEWS
ग्रेव्हीसाठी साहित्य- हिरवीगार कोवळी भेंडी सर्वसाधारणपणे पाव किलो (चार माणसे आरामात खाऊ शकतात), अर्धी वाटी आंबट दही, एक चमचा आल्याचा कीस, दोन हिरव्या मिरच्या, चवी पुरती साखर, जाडसर शेंगदाणा कुट दोन चमचे, एक चमचा कॉर्नफ्लोअर, फोडणीसाठी तूप, हिंग, जिरे, चवीसाठी थोडे मीठ.

कृती : सर्वप्रथम भेंडी धुवून घ्यावी. देठ काढून भरलेली भेंडी करतो तशी मध्यभागी चिर द्यावी. दही, आल्याचा कीस, हिरव्या मिरच्या, मीठ, साखर, दाण्याचा कुट एकत्र करुन मिक्सरमधून बारीक करुन घ्यावे. नंतर तूपाची फोडणी करावी. चिरलेली भेंडी फोडणीत घालून परतावी. भेंडी मऊ होईपर्यंत दही घालू नये. नंतर दही, कुट आणि अर्ध्यावाटीत पाणी घेऊन त्यात कॉनफ्लोअर टाकावा. हे साहित्य भेंडीवर घालावे. अर्धाचमचा हळद टाकावी. गॅस मंद ठेवावी. ऊकळी आल्यानंतर भेंडीसह यलो ग्रेव्ही काढावे. सजावटी साठी नारळ चव, हिरवी कोथिंबीर घालावी. साध्या भाता बरोबर यलो ग्रेव्ही उत्तम लागते.

Share this Story:

Follow Webdunia marathi