श्रीलंकेच्या उत्तर भागात सुरू असलेल्या युद्धाबद्दल अमेरिकेने तीव्र चिंता व्यक्त केली असून तेथील स्थिती गंभीर असल्याचे म्हटले आहे. श्रीलंकेचे सरकार आणि लिट्टे आमचे ऐकत नसल्याबद्दलही अमेरिकेने नाराजी व्यक्त केली आहे.
अमेरीकन परराष्ट्र मंत्रालयाचे कार्यवाहक प्रवक्ता रॉबर्ट वूड यांनी पत्रकारांना सांगितले, की श्रीलंकेचे सरकार आणि लिट्टे यांच्यातील संघर्ष अंतिम टप्प्यात असून केवळ अमेरिकाच नाही तर जागतिक समुदायाचेही ते ऐकेनासे झाले आहेत.