साहित्य : 2 वाटी रवा, 100 ग्रॅम शिंपला मश्रुम, 2 मोठे टोमॅटो, 4 हिरवी मिरची, 1 वाटी सांभार, दही, मीठ, तेल, 1/2 चमचा बेकिंग पावडर.
कृती : दही मीठ व पाहिजे असल्यास पाणी टाकून रवा पातळ भिजवून घ्या. 2 तासानंतर त्यात बारीक चिरलेले मश्रुम तेलात परतून घ्या. भिजलेल्या रव्यात हिरवी मिरची, सांभार सोडा, 1 चमचे गरम तेल व टोमॅटो टाका शेवटी थंड झालेले मश्रुम टाका. हे मिश्रण तव्यावर उत्तपम टाका येईल एवढे पातळ हवे. नॉनस्टिक किंवा डोसाच्या तव्यावर उत्तपम टाका व तेल सोडून भाजून घ्या. ओल्या नारळाची चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा